Back to Home
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती
Event
11 Apr, 2026

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि दीन-दलितांचे कैवारी म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. महाराष्ट्राच्या मातीत समतेचे बीज पेरणाऱ्या या महामानवाची...

07:44 PM
महात्मा फुले शैक्षणिक संकुल, संगमनेर नका, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक

Event Date

11 Apr, 2026

Event Time

07:44 PM

Location

महात्मा फुले शैक्षणिक संकुल, संगमनेर नका, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि दीन-दलितांचे कैवारी म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. महाराष्ट्राच्या मातीत समतेचे बीज पेरणाऱ्या या महामानवाची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा एक संकल्प आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्यामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. जेव्हा समाज रुढी-परंपरांच्या जोखडात अडकला होता, तेव्हा जोतिबांनी ज्ञानाची मशाल हाती घेतली. त्यांनी केवळ स्त्रियांच्या शिक्षणाची दारे उघडली नाही, तर अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे हे क्रांतिकारी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कुटुंबीय, नातेवाईकांसह प्रियजनांना शुभेच्छा.
Category: Event
Posted on 26 May, 2026
Loading ......